Sunday, 12 March 2017

ज्ञानभाषा माय मराठी

ज्ञानभाषा मराठी समूहातर्फे, ९० व्या अखिल भारतीय  मराठी साहित्य संमेलनात, आपल्या समूहातर्फे मराठी शाळांचे सामर्थ्य काय आहे, तुमच्या मुलांना मराठी शाळांमध्ये शिकल्यावर काय फायदा होऊ शकतो, यावर पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशन देण्यात आले होते.


हेच  प्रेझेन्टेशन आणि इतर अनेक उपयोगी साहित्य तुम्हाला पाठवत आहोत. विविध व्यासपीठांवर मराठी शाळांचा मुद्दा सक्षम आणि प्रभावीपणे मांडून आपल्या शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी याचा उपयोग करा, याशिवाय पालकांनी दिलेल्या माहितीतून बोध घेऊन, आपल्या पाल्यांसाठी योग्य निर्णय घ्या.


(तुमच्या laptop मध्ये पीपीटीतील मराठी font नसल्याने पीपीटी पाहण्यात अडचणी येऊ शकतात. हे font बालभारतीच्या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध आहेत. या मेल मध्ये देखील दिलेले आहेत. प्रथम font install करा आणि मग पीपीटी वापरा. तुम्ही सरळ युट्युबचे व्हिडीओ बघू शकता )


-----------------------------------


१. मातृभाषेतून_शिक्षण.pptx

 मातृभाषेतून_शिक्षण.pptx

​व्हिडीओ - https://www.youtube.com/watch?v=LdNLxSIDAFI


२. आजच्या मराठी शाळा - आयएसओ/डिजिटल/ज्ञानरचनावादी - आजच्या_मराठी_शाळा.pptx​

 आजच्या_मराठी_शाळा.pptx

​व्हिडीओ - https://www.youtube.com/watch?v=1rqGx0V1REA


३. मराठी_शाळांचे _फायदे .pptx​

 मराठी_शाळांचे _फायदे .pptx

​व्हिडीओ - https://www.youtube.com/watch?v=pOaYtCY8BHs


४. अवांतर.pptx​

 अवांतर.pptx

​व्हिडीओ - https://youtu.be/UvdU5HsSr9E


५. डॉ. प्रवीण महाजन - भारतीय आयुध निर्माण

व्हिडीओ - https://www.youtube.com/watch?v=t3Jw1ECPAs0


६. श्री. अच्युत गोडबोले - मराठी शाळांसाठी मनोगत

व्हिडीओ - https://www.youtube.com/watch?v=itiZ3mLFvm4


७.  प्रा. अनिल गोरे - मराठी माध्यमाचे महत्त्व विषद करणाऱ्या भाषणाचा दुवा.

https://www.youtube.com/watch?v=mTwrPye0f1Y


८. डॉ. वसंत काळपांडे - पूर्ण भारतात, इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांची अधिकृत आकडेवारी. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील किती मुले इंग्रजी माध्यमात जातात याची देखील आकडेवारी मिळू शकते. यावरून तुम्ही पटसंख्या वाढीची दिशा ठरवू शकता(शिक्षकांसाठी/शाळांसाठी उपयुक्त माहिती). यावरून समजेल केवळ काही शहरांमध्ये तेही आधुनिकीकरण झपाट्याने झाल्याने तसेच मॉल संस्कृतीमुळे मराठी शाळांच्या टक्केवारीमध्ये फरक पडला आहे पण आजही ८० टक्केच्यावर महाराष्ट्र मराठी शाळांमधूनच शिक्षण घेतो. - KalpandeSir.pptx


९. डॉ. श्रुती पानसे - मराठी माध्यमाचे फायदे आणि इंग्रजी माध्यमाचे तोटे - Shruti_Panse.pptx


१०. आंतरराष्ट्रीय_भाषा_धोरण - केंद्रीय प्रशासकीय सेवांमध्ये इंग्रजीला अवास्तव महत्त्व देणे, या भारत सरकारच्या निर्णयाचा विरोध म्हणून हा १८ पानी निबंध लिहिला गेला. केंद्र सरकारने आपला चुकीचा प्रस्ताव १५ मार्च-२०१३ ला परत घेतला. हा पूर्ण निबंध वाचल्यानंतर समजेल की, इंग्रजी ही जागतिक भाषा! हा आपला गोड गैरसमज आहे.- Bhasha_Dhoran.pdf


११. रचनावादाचं शास्त्र आत्मसात करायला हवं (रमेश पानसे) - तुम्हाला आज जिल्हा परिषद शाळांमध्ये ज्ञानरचनावादी शिक्षण मिळते आहे तर दुसरीकडे, ५०-६० वर्षे जुन्या पद्धतीने!!!

वाचा - Jilha_Parishad_Shala.pdf


आभारी आहोत,ज्ञानभाषा मराठी


Saturday, 11 March 2017

App कसा बनवावा ?



आपल्याला APPS बनवायचे आहे.❇

मग खालील प्रमाणे करू शकता.
       APPS निर्मिति
⬇⬇⬇⬇⬇⬇⬇⬇⬇⬇⬇⬇⬇⬇
[1]WWW.APPSGEYSER.COM या वेबसाइट वर सर्च करा
⏬⏬⏬⏬⏬
[2]आपल्या E-MAIL ID व् PASSWORD टाकून LOGIN करा.
⏬⏬⏬⏬⏬
[3]त्या नंतर CREATE APPया बटन वर क्लिक करा.
⏬⏬⏬⏬⏬
[4]त्यानंतर आपल्याला हव्या त्याप्रकारचे APPS CREATE करू शकता.
`📱📱धन्यवाद📱📱
                   

Tuesday, 7 March 2017

EDUCATIONAL APPS

*EDUCATIONAL APPS*

मित्रांनो
*प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम*
अंतर्गत मोबाइल डिजीटल शाळांना वाव मिळाला, पाहता पाहता हजारो शाळा मोबाइल डिजीटल झाल्या…

परंतू मोबाइल हे केवळ व्हिडीओ व चित्र पाहण्यापुरते मर्यादित नसून याद्वारे असंख्य शैक्षणिक अॅप्‍स चा मनमुराद आनंद आम्ही विद्यार्थ्यांना मिळवून देवू शकतो, फक्त गरज आहे ते अॅप्‍स माहीत होण्याची.

केवळ मी काही अॅप्सची यादी देतो म्हटलं तर हजारो अॅप्सची यादी आपल्याला गूगल बाबाच्या सहाय्याने देता येईल, परंतू ते अॅप्‍स किती प्रभावी व परिणाम कारक हे तेव्हाच सांगता येईल जेव्हा मी ते अॅप्‍स वापरलेले असणार…

आणि  म्हणून ही यादी..

*आपले आवडीचे app व वापर लिहा व forward करा.*

1. Kidsmath
गणित प्रक्रिया बालकांकरीता उपयुक्त
2. Barakhadi 2.0
बाराखडी साधे शब्द
3. Animal ABC
4. eschool4scratch
खेळातून मनोरंजन, शब्दसंपत्तीत वाढ
5. Animal 4D
आभासी प्रतिमा दाखवणे
6. Hello English
इंग्रजी सराव करीता उपयुक्त
7. Attendance taker
विद्यार्थी हजेरी
8. Anatomy 4D
मानवी शरीर अंतर्बाह्य रचना
9. Space4D
अंतराळ अभ्यास
10. Marathi kids
धुळपाटी सारखा वापर, वर्णमाला, अंकओळख, गणित, भाषा वापर
11. 50marathistories
50 छान छान गोष्टी आहेत
12. Android Balwaadi
मराठी, इंग्रजी वाचन लेखन
13. Writings ABC 123
इंग्रजी मुळाक्षरे कसे लिहावे
14. Kings of Math
वर्ग ५ चे गणित
15. Jay Maharashtra
थोर व्यक्तींची माहीती
16. Numbers
अप्रगत मुलांसाठी
17. Kinemaster
व्हिडिओ बनवू शकतो
18. How to make origami
कागदापासून वस्तू कशा तयार कराव्यात याचे चलचित्र
19. Google Maps
एखाद्या ठिकाणचा नकाशा पाहणे
20. Kids paint
विद्यार्थ्यांकरीता ड्राईंग
21. Educational Games
एकत्रित मनोरंजन खेळ
22. Google Earth
गूगल मॅपला सबस्टिट्यूट
23. Solar system
सर्व प्लॅनेट विषयी माहिती देता येते
24. Quiz maker
ऑफलाइन टेस्ट बनविणारे apps
25. Tricks for GK
प्रत्येक गोष्ट लक्षात राहण्यासाठी tricks
26. Anmol goshti
बालकांकरीता कथा
27. Marathi dictionary
समानार्थी शब्द
28. English Marathi Dictionary
इंग्रजी मराठी शब्द
29. Khagol vishw
भूगोल teaching साठी उपयुक्त
30. ezpschool
पाठपुस्तक pdf दाखवणे
31. Google translation
कोणत्याही भाषेतून भाषांतर
32. Foxit pdf
पुस्तकांसोबत interactions
33. Starchart
अवकाश अभ्यासासाठी उपयुक्त
34. Gurukul study
इ 1 ली ते 8 वी अभ्यासक्रमातील प्रश्न
35. Gom gr
शासन निर्णय
36. TeamViewer
37. Mirrorop
38. Share it
39. Mobizen
40. Airdroid
हे सर्व apps स्क्रिन कास्ट करीता
41. Google Googles
चित्र वरुन searching करा
42. Skype
व्हिडिओ कॉल अत्युत्तम 2G वर पण
शैक्षणिक
43. Math tips and tricks
गणितातील क्लृप्त्या
44. Vedik Math
45. Xallaps multiplication
46. – – Addition
47. – – greater than less than
48. Math formulae
49. Clock learning
50.eduDroid
51. amazing india in hindi
52. shivaji & Maratha empire
53. ABC handwriting free
54. kid science : biology
55. Fun with Dots – kids learning
56. 35 pictures stories for kids
57. my class shedules
58. sky guide for kids
59. olympaid quiz
60.  Nasa app
61. Chota bheem
62. Indian currancy game
63. math challenge
64. science game for kids
65. kelvin
66. kids gk test
67. science experiment with water
68. Abacus
69. Match and spell
70. Animal planet
71. Brain Trainer special
72.English conversation
73.Lanets space facts
74.Fun easy learn english
75.Evo memo
76.1St std marathi
77. Cursive lite
78. Fun do science
79. colourful vitamins
80. hindi writing
81. Junior science master
82. Creative kids
83.marathi mulalshare
84. Kids craft ideas
85. kidzoo
86. kids experiments
87.sage kids
88. kids encyclopedia
89. forts of maharashtra
90. Tux4kids
गणिताचा सराव
91. Hello English
नविन शब्दांचे उपयोजन सोदाहरण
92. Qr droid
Q R code ला scan करणेकरीता, अभ्यासक्रम पुस्तके या qr कोड सह आलेली आहेत.
93. Picsart
फोटो कोलाज, फोटो एडिटिंग
94. Blendcollage
फोटो कोलाज, फोटो एडिटिंग
95. Way 2 SMS
फ्रि SMS जगभर
96. Paytm
डेबिट कार्ड वरुन रिचार्ज
97. Vidmate
98. Tubemate
यू ट्यूब व्हिडीओ डाऊनलोडर
99. Kingsoft office
100. Office suit
Ms office चा वापर
101. Marathi Greetings
शुभेच्छापत्र बनविणे
102. Passportpics
पासपोर्ट बनविणे
103. Lumosity
बुद्धि ला खुराक
104. Flowers color
106. Flash card for kids
107. Gadwat
किल्ले
108. Khara mitr
109. Varnmala lite

110. Kids doodle
111. Zebra paint
113. Pratiyogita mantra
114. Table
115. Flute
116. Piano
117. Dumpster app
मोबाइल चे recycle bin
118. Google Drive
मोफत १५ जीबी
119. Text fairy
फोटोवरचा मजकूर कॉपी करा
120. Sidebook
आकर्षक PDF reader
121. Grade stalk
ऑनलाइन अध्ययन
122. Apps backup & restore
123. Android tutorial
124. S2G Excel
एक्सल मराठीत शिका
125. Telegami
अॅनिमेशन व्हिडीओ
126. Varshik Niyojan

Add your favorite app and repost.

ABL विषयी माहिती

*ABL म्हणजे Activity Based Learning ( कृतीयुक्त अध्ययन पद्धती )*

🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

ABL ही एक प्रभावी व परिणामकारक अशी अध्ययन पद्धती आहे. पारंपरिक अध्ययन पद्धती पेक्षा ही पद्धत वेगळी असून विध्यार्थी हा केंद्रबिंदू असतो. तो प्रत्यक्ष कृतीतून शिकतो. त्यामुळे केलेले अध्ययन हे प्रभावी व चिरकाल टिकणारे असते. या पद्धतीत शिक्षकाची भूमिका ही मार्गदर्शकाची असते.

# *ABL पद्धतीची संकल्पना :-*
या पद्धतीत मुलांना स्वतः कृती करून शिकावे लागते. यामध्ये इयत्ता 1ली ते 4थी च्या वर्गांच्या अभ्यासक्रमाची मांडणी माईल स्टोन मध्ये *( milestone )* मध्ये केलेली आहे. यात घटक, उपघटक, पाठय मुद्दे वेगवेगळ्या कृतींमध्ये विभागले आहेत. या कृती/ कार्ड यांची क्रमबद्ध मांडणी म्हणजे मइलेस्टोल होय. असे प्रत्येक विषयात 10 ते 15 टप्पे म्हणजे *milestone* आहेत.
            या milestone ची मांडणी केलेला तक्ता म्हणजे ladder होय. ladder हे त्या विषयाचे वार्षिक नियोजन असते. प्रत्येक ladder वरील प्रत्येक milestone मध्ये 10 ते 14 कृती / कार्ड असतात. यातील कार्डांपैकी पहिल्या कार्डावर संकल्पना / संबोध स्पष्ट केलेला असतो. पुढे पुढे त्याची व्याप्ती वाढत जाते व भरपूर सराव असतो. सरावानंतर शेवटी मूल्यमापनावर / शिष्यवृत्तीवर आधारित कार्ड वि. सोडवावे लागते. मूल्यमापन कार्ड (गुच्छ) म्हणजे त्याने अभ्यासलेल्या घटकावर आधारित चाचणी असते. ती चाचणी वि.स अचूक सोडवत आली तर तो milestone त्या वि.चा पूर्ण झाला असे समजावे . जर त्यास अचूक चाचणी सोडवता नाही अली तर पुन्हा त्या milestone मधील कार्ड सोडवावेत.

# *ABL साहित्याची ओळख :-*
                 ABL चे साहित्य / कार्ड कोणत्या इयत्तेचे आहे हे समजण्यासाठी प्रत्येक इयत्येचा रंग निश्चित केलेला असून तो रंग त्या इयत्तेच्या कार्ड भोवती दिलेला आहे.

*इयत्ता व रंग पुढीलप्रमाणे*
      इयत्ता           रंग
     पहिली।         लाल
     दुसरी।           हिरवा
     तिसरी।          निळा
     चौथी।            केशरी(फिकट)
       रंगप्रमाणेच प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे लोगो वापरलेले आहेत.ते पुढीलप्रमाणे
        विषय।        लोगो
        भाषा           प्राणी
        गणित।        पक्षी
        इंग्रजी          वाहने
        परिसर1      फळे
        परिसर2      दिवे
  प्रत्येक कार्डाच्या उजव्या कोपऱ्यातील अंकावरून त्या कार्डाचा ladder वरील क्रमांक समजतो. त्याखालील क्रमांक हा कोणत्या माईलस्टोन मधील कितव्या क्रमांकाचे कार्ड आहे हे समजते.या क्रमांकाचा उपयोग वर्क डन रजिस्टर मध्ये नोंदवण्यासाठी होतो.
# *वर्गखोलीचे नियोजन : -*
        या अध्ययन पद्धतीत इयतानिहाय वर्ग नसून विषयनिहाय वर्गखोली असते.त्या त्या वर्गखोलीत त्या त्या विषयासाठी स्वतंत्र रँकची रचना करून त्यात इ.१ली ते ४थी ची सर्व कार्ड ठेवायची असतात.तसेच त्या विषयाचे इ१ली ते ४थी चे ladder  भिंतीवर लावायचे. त्यामुळ एकाच वेळी सर्व स्तरातील वि. त्या विषयाची अध्ययन कार्ड सोडवू शकतात.

# *अध्ययनाचे ६ टप्पे : -*

वि. अध्ययन कार्ड सोडवत असताना त्याला १ mileston पूर्ण करण्यासाठी ६ टप्प्याने फिरावे लागते. कार्डवरील लोगो पाहून तो वि. योग्य त्या गटात बसून अध्ययन करतो. त्यासाठी प्रत्येक विषयाच्या ६-६ अध्ययन थाळ्या (समूह थाळ्या) आहेत.

# *वेळापत्रक व गट कसे करावे : -*

   शाळेचा पट, शिक्षकसंख्या व वर्गखोल्या यांचा विचार करून ABL चे गट /वेळापत्रक करावे लागते. सर्व गटात साधारणपणे सर्व स्तरातील वि.येतील असे नियोजन करावे. वेळापत्रक करताना दररोज किमान 2 मुख्य विषयांचे अध्ययन होणे अपेक्षित आहे.

 # *दिवसभराची कार्यवाही : -*

       ABL राबवत असताना सकाळ सत्रात परिपाठनन्तर 30 ते ४0 मि. साईड ladder वरील त्या महिन्यातील कृती घ्यावी. या कृतीत त्या वर्गातील सर्व वि.सामूहिकरीत्या सहभागी होतील.(गाणी,गोष्ट,कविता)
       त्यांनतर मुख्य २विषयांचे सव्वा ते दीड तासांचे प्रत्येकी अध्ययन होईल. दुसऱ्या सत्राच्या शेवटी पुन्हा ३०ते४०मी विषयानुसार सामूहिक कृती घ्यावी.
सत्र पूर्व व सञोत्तर कृती ह्या आपापल्या वर्गात सामूहिकरीत्या घेणे अपेक्षित आहे.

# *ABL अध्ययन  पद्धतीचे  फायदे : -*

🔸वि. स्वतःच्या गतीने व क्षमतेने शिकतो.
🔸वि .ला दिवसभरात २ विषयांचे अध्ययन करावे लागत .
🔸वि. प्रत्यक्ष कृती करून शिकत असल्याने अध्ययन प्रभावी व परिणामकारक होते.
🔸सराव व दृढीकरणाला भरपूर वाव आहे.
🔸वि.ने अध्ययन केलेल्या घटकवरच परीक्षा(चाचणी)असते. त्यामुळे परीक्षाचा ताण नसतो.      
🔸हसत खेळत ,मनोरंजनातून शिक्षण होते.
🔸वि.सतत कार्यमग्न राहतो.
🔸वि.चा सर्वांगीण विकास होतो.                             🔸वि.एका वर्षात एकापेक्षा जास्त इयत्तांचा अभ्यास करू शकतो.
🔸सहकार्याची भावना वाढीस लागते.

# *ABL या अध्ययन पद्धतीच्या मर्यादा : -*

🔹या पद्धतीत शिक्षकाला रॅक, ladder, कार्ड ,लोगो,समूहथाली, माईलस्टोन यांची माहिती असावी लागते.
🔹प्रत्येक वर्गाची पटसंख्या साधारण ३०पर्यंतच असावी.
🔹एकदा मिळालेले ABL चे साहित्य खराब झाल्यास ते पुन्हा मिळवताना अडचणी येतात.
🔹ABL असलेल्या शाळेत शिकलेला एखादा वि. ABL उपक्रम नसलेल्या शाळेत शिकण्यास गेला तर त्याला पारंपरिक पद्धतीने अध्ययन करावे लागते.

ब्लॉग कसा बनवावा

ब्‍लॉग कसा बनवावा.

सुदाम साळूंके जुन्नर
 7588094067

How To Create New Blog...    
            ब्‍लॉग हे वेबलॉग या शब्‍दाचे लघुरुपांतर आहे. हा संकेतस्‍थळाचाच म्‍हणजे वेबसाईटचाच प्रकार आहे. ब्‍लॉग हे एक व्‍यक्‍ती किंवा व्‍यक्तिंचा समूह ब्‍लॉग निर्माण करतो. ब्‍लॉगमध्‍ये मजकूर, व्हिडीओज, ऑडिओज, चित्रे आणि वेबलिंक्‍स (सांधे) दिलेले असतात. नविन मजकूर ब्‍लॉगवर लिहिणे किंवा प्रकाशित करणे याला 'ब्‍लॉगिंग' असे म्‍हणतात. ब्‍लॉगवरील लेखांना 'ब्‍लॉगपोस्‍ट' 'एन्ट्रिज' म्‍हणतात. ब्‍लॉग लिहीणा-या लेखकांना ब्‍लॉगर म्‍हणून संबोधले जाते. आज ब्‍लॉगवर कोट्यावधी लेख नविन ब्‍लॉग वेबवर झळकत आहेत. चला तर मग आपणही नविन ब्‍लॉग तयार करुया.....
नविन ब्‍लॉग तयार करण्‍यासाठी आवश्‍यक घटक.....
१. स्‍वत: चा Gmail  ID
2. नेट कनेक्‍शन        
वरील दोन्‍ही गोष्‍टी उपलब्‍ध असतील तर ब्‍लॉग तयार करण्‍यासाठी काही अडचण येणार नाही फक्‍त ५ मिनीटात तुमचा ब्‍लॉग तयार होईल. सर्वप्रथम www.blogger.com या साईटवर तुमच्‍या gmail Id व्‍दारे Log  in  करा.
Log in केल्‍यानंतर Bogger Dashboard open होईल जसे...
 blogger dashboard वर  New blog असे चौकट किंवा बटन दिसेल त्‍यावर क्लिक करा लगेच दुसरा विंडो उघडेल.
जसे.....
 वरील विंडोजमध्‍ये तुम्‍हाला ब्‍लॉग टाईटल (Title) द्यावे लागेल उदा. Address मध्‍ये तुमच्‍या ब्‍लॉगला तुम्‍ही काय अड्रेस देणार आहात हे ठरवावे लागेल. तुमच्‍या नावाने अड्रेस तयार करता येईल.  किंवा blog address टाईप केल्‍यानंतर उपलब्‍ध आहे किंवा नाही तपासून पाहिले जाईल उपलब्‍ध नसेल तर sorry this blog address is not available म्‍हणून त्‍याखाली मेसेज दिसेल दुस-या नावाने प्रयत्‍न करा उपलब्‍ध असेल तर blog address is available असा मेसेज येईल available असेल
ब्लॉग वेबसाइट कशी बनवायची ?
1 💻 ब्लॉग तयार करण्यास स्वताःचा Gmail id व Password असणे आवश्यक आहे.
2 💻 प्रथमतः www.blogger.com वर जा.
3 💻 तेथे Gmail चा login id / username व password टाकून login / signin करा.
4 💻 यानंतर New Blog ला click करा.
5 💻 पुढे Blog चे (Tital )शिर्षक व तुम्हाला ठेवायचा Blog address टाका.
जसे e.g  [salunkeguruji.blogspot.com]
6 💻 त्याखालील हवे ते Template निवडा .
7 💻 create blog ला click करा .
8 💻 निवडलेल्या Template  वर Blog ची रचना अवलंबून असते .
9 💻 आता new post वर click करा .
10 💻 MSWord प्रमाणे Page open होईल .
11 💻 तेथे आपली post तयार करा .
12 💻नंतर publish करा .
13 💻 समोरील view blog करून आपली blog website पहा .
14 💻 नंतर layout वर जा तेथे header मधे blog मुखपृष्ठासाठी Photo add करा .
15 💻 त्याखालील gadget वर क्लिक करा .
16 💻 त्यात आगोदर तयार केलेली pages select करून save करा .
17 💻 हे पेजेस तुम्हाला blog च्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील .
18 💻 Pages tab टाकण्यास - new page click करा व त्याचे Title टाकून तयार करा .
19 💻 माहिती तयार असल्यास भरा फोटो टाका .
20 💻 नंतर खालील add gadget वर क्लिक करा व हवी ती gadget add करा.
21 💻 आता layout page च्या डाव्या बाजूला Template designer वर क्लिक करून ब्लॉग design करता येते .
22 💻 layout वर sidebar कसे हवे ते select करा व apply to blog करा .
23 💻 शेवट advanced menu वर क्लिक करून रंगसंगती 🎨 ठरवा .
24 💻 खाली तुम्हाला live blog दिसेल .
25 💻  सर्व रचना झाली की apply to blog करायला विसरू नका .
26 💻 आपल्या इतर फाईल Google drive , Dropbox वर Save करून तेथील link copy  करून ब्लॉग वर हवी तेथे pest करू शकता .
  आपणांस आपला ब्लॉग बनविण्यास हार्दिक शुभेच्छा !
Sudam Salunke
  🇮🇳  धन्यवाद !

🙏🙏नमस्कार
आज आपण  मोफत वेबसाईट  कशी तयार करावी हे शिकणार आहोत.
👇👇👇👇👇👇👇👇
 👉👉सर्व प्रथम ब्राउझर वर टाइप करा weebly .com.
आता weebly ची वेबसाईट Open होईल.
👉👉आपल्या कडे face book account असेल तर face book वर साइन करून सुरवात करू शकता.
नसेल तर Gmail  ने सुरु करु शकता.
👉👉प्रथम आपले पूर्ण नाव टाका.
नंतर email टाका. नंतर password टाका.
👉👉तद्नंतर  साइन अप फ्री वर क्लिक करा.
👉👉आता आपण weebly मध्ये login असाल.
👉👉स्वत:च्या वेबसाईट साठी प्रथम आपल्याला थीम select करावी.
👉👉आपली वेबसाईट कशी दिसावी यासाठी.
वेगवेगळ्या थीम दिसतील. आपल्याला योग्य असेल अशी थीम select करा.
👉👉आता weebly मध्ये option येतील.त्यात  Register a New Domain यावर क्लिक करू नका .रजिस्टर केल्यास दर वर्षी काही रक्कम भरावी लागते.
👉👉आपल्याला फ्री वेबसाईट तयार करायची असल्याने Use a Subdomain of Weebly .com वर क्लिक करा.
त्यातील  box मध्ये आपल्याला हवा असलेला address type करा आता continue वर क्लिक करा.👉👉तद्नंतर Build may Site वर क्लिक करा.
👉👉आता आपली वेबसाईट कशी असेल हे दिसून येईल. आपण येथे हवा तसा बदल करू शकता.
👉👉My Site आपल्याला हवे असलेले नाव टाका उदा. मी माझा .सुदाम साळुंके .
👉👉तेथे आपण Logo हि टाकू शकतो.आपल्या laptop वरून फोटो अपलोड करू शकतो.
त्याखाली एक चित्र असेल तर तेही आपण आपल्या laptop वरून फोटो अपलोड करू शकतो.
👉👉यात आपण एका पेक्षा जास्त फोटो अपलोड करू शकतो.
👉👉आता आपली वेबसाईट दिसून येईल त्याखाली आपण काही मजकूर टाकू शकतो .प्रथम आपण शीर्षक टाकू या. 👉👉उजव्या बाजूला text चे बरेच options दिसून येतील. ते ड्रग करून आपण वेबसाईट रचना करु शकतो.
👉👉Text मध्ये आपण माहिती भरु शकतो त्याचा आकार बदलू शकतो. रंग बदलू शकतो.
👉👉आपल्या पसंती नुसार येथे मजकूर टाकू शकतो.    
👉👉उजव्या बाजूला वरती face book , tweeter यासारखे option दिसतील त्याच्या शेजारी.आपण आपल्याला हवा असलेला.हेडलाईन टाकू शकतो.  
👉 👉 आपल्या  वेबसाईटला सोशल बेब वर आपण लिंक करू शकतो.यात आपण सोशल मेडिया add करू शकतो.

👉👉याचा फायदा असा होतो कि जे आपल्या वेबसाईटला सर्च करत असतील ते या सोशल मेडीयातून  आपल्याशी संपर्क करू शकतील.
👉👉आता शेवटची स्टेप वरती उजव्या बाजूला PUBLISH या बटनावर क्लिक करा.
👉👉आत्ता आपल्यास पुन्हा विचारले जाईल कि,आपल्या जवळ Domain आहे का ? Register a New Domain यावर क्लिक करू नका .👉👉रजिस्टर केल्यास दर वर्षी काही रक्कम भरावी लागते.
👉👉आपल्याला फ्री वेबसाईट तयार करायची असल्याने Use a Subdomain of Weebly .com वर क्लिक करा.    👉👉आता नवीन window येईल.Categorize Your Website मध्ये Select website type वर क्लिक करा.त्यात.personal,Bisiness,Educational असे अनेक options येतील.👉👉त्यातील आपण Educational select करू या.त्यात Informational आपण select करूयात. 👉👉तद्नंतर Continue वर क्लिक करा.  
👉👉आता आपले account व्हेरीफाय बाबत विचारले जाईल.त्यात click to Continue वर क्लिक करूयात.
👉  👉आता शेवटी आपल्याला आपल्या देशाचे नाव टाकायचे आहे.
नंतर आपला मोबाईल नंबर  टाकून submit वर क्लिक करायची आहे.
👉👉आता आपल्या मोबाईलवर एक SMS आला असेल त्यातील अंक box मध्ये टाकून submit वर क्लिक करायची आहे.
👉👉आता आपल्याला स्क्रीनवर दिसेल You’ve successfully verifild your account ! म्हणजे आपली वेबसाईट पूर्ण झाली.  
  👉👉आता click here to continue वर क्लिक करा.

         आपला तंत्र स्नेही मित्र
            सुदाम साळूंके जुन्नर
         .       7588094067